हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ७ जुलै, २०११

आई, बाबा मी केला काय गुन्हा

ये आई ईकडे तिकडे कायबघतेस मी तुझ्या आतून बोलतेय. तुझंच रूप तुझ्याच उदरात वाढत असलेलं या नव्या जगात पाऊल टाकण्याची स्वप्न बघत असलेले. आई काय ऐकतेय मी हे. तू मला स्विकारायला तयार नाहीस. अगं तुझ्या अंशाला जो तुझ्या उदरात वाढतोय त्याला त्याला तू कापू फेकून देणार आहेस. रक्तामासाचा गोळा आहे गं मी. मी ही एक जीव आहे. माझ्या भावना अव्यक्त असल्या म्हणून काय झालं. पण मलाही यातना होतातच ना. केवळ तुम्हाला नको म्हणून मला काढून फेकताय. किता निष्ठूर झालीस गं तू आणि बाबा देखील.
बाबा मित्राला मुलगी झाली की तुम्हीच म्हणायचात ना, पहिली बेटी धनाची पेटी बाबा, मी तुमची धनाची पेटी तुमच्याच बायकोच्या उदरातून बोलतेय आता ही पेटी का फेकून देताय आता किटाळासारखी. आईच्या गर्भात वाढत असताना मंदीराच्या गर्भगृहात वाटावा तसा आनंद आणि विलक्षण समाधान मला वाटत होतं त्याच गर्भगृहाचा खाटीकखाना करताना तुम्हाला काहीच का वाटतं नाही.
खरं सांगू बाबा माणसं प्रगत का झाली तेच कळत नाही. शिकलेली माणसे एवढी जनावरं बनतील असं वाटलं नव्हतं जुन्या काळी देखील मुलांचा मोह होता. पण परमेश्वराने दिलेलं दान सहर्ष स्विकारल जायचं. ते आजच्या सारखे प्रगत नसूनही जंगली नव्हते.एखादा जीव जन्माला येण्यापूर्वीच कापून टाकत नव्हते. नव्या मशीनचा शोध लागला आणि माणसं जनावरे झाली नाही का हो बाबा.
आई- बाबा तुमचंच रूप मी तुमचंच प्रतीक वाढण्याची मोठं होण्याची आस मनात घालून ईश्वराने तुमच्या उदरात मला पाठवलं पाठवताना अनेक स्वप्न दिली आशा दिल्या आकांक्षा दिल्या. आई जेव्हा ते गाणं ऐकैयची ना दिल है छोटासा छोटीसी आशा, मुठ्टी भर मनकी भोलीसी आशा तेव्हा माझ्या मुठभर शरीरातही जगण्याची आशा आईच्या गर्भात उमलायची. तुमच्या जीवाचा आरसा मोठा होईल, खुप मोठा असं मी ठरवलं होतं पण तुम्ही काय करताय आई बाबा, तुमच्या रक्तामासाच्या गोळ्याला वैद्यकीय कचरा करताय. आईच्या उबदार कुशीतून भावनाशुन्य डॉक्टर मला बाजूला करतील आणि प्राण नसलेला रक्तामासाचा तुकडा एक मेडीकल वेस्टेज ठरेल. कचरा ठरेल. आई बाबा तुम्हाला याचं काहीच वाटतं नाही का. तुमचा एक अंश  असा वाया घालणार आहात का तुम्ही. आणि का? मी असा कोणता गुन्हा केलाय म्हणून मला असी शिक्षा देताय. ईश्वराने मला स्त्री जातीत जन्माला घालावं हा काय माझा दोष झाला का ते आपणच सांगा.
आई बाबा मला जगायचय मला या असं फेकून देऊ नका प्लीज. मला जगात येऊ द्या मोठं होऊ द्या मी तुमच्या वंशाचा दिवाच ठरेल एक दिवा लावम्यासाठी माझ्या जीवनात कायमचा अंधार का? मी असा काय गुन्हा केलाय.....

1 टिप्पणी: