सुभद्रेच्या गर्भात अभिमन्युने चक्कव्युह भेदण्याची कला शिकली होती म्हणे, आजी तू तर मला गर्भात मारण्याची भाषा करते आहेस. ती मला कळणारच ना! का आजी असा विचार करतेस? मी मुलगी आहे म्हणुनच ना! का मला भावना नाहीत मलाही हे सगळे सुंदर जग बघावे वाटतेच ना. माझ्याही स्वप्नांना तुझ्या कोतुकाचे पंख हवेत आजी. आणि तुच आता माझा जीव घ्यायला निघालीस मी जगात येण्याअगोदरच.. का मी तुझ्या वंशाचा दिवा होऊ शकत नाही म्हणुनच ना!
तुझा सुरूकतलेला हाता माझ्या गालावर कौतुकाने फिरावा असं मलाही वाटतं. संध्याकाळी दिवा लागल्यावर तुझ्या मांडीनर बसून परवंचा म्हणावा असं मलाही वाटतं. संध्यकाळी तुच तयार केलेल्या गरम गरम गोधडीत तुझ्या तोंडून परीच्या गोष्टी ऐकत गोड झोपावं असं मलाही वाटत आजी! तू कधी भयानक राझसाची गोष्ट सांगशील आणि घाबरलेली मी तुझ्या कुशीत लपेल. तु देखील आपल्या नऊवारी पातळाच्या मोठ्या पदराआड घेशील एक गोड पापा घेशील आणि त्याच आनंदात मी गाढ झोपी जाईल अशी कितीतरी गोड स्वप्न पाहिलीत मी आजी. तुझा हात पकडून लुटूलुटू चालत मी जयबाप्पाच्या मंदीरात जाईन तिथे प्रसाद मिळालेली साखर तू माझ्या ईवल्याशा हातावर घालशील आणि मी ती साखर खाताना सगळा ङात चिकट करेल, माझा चिकट झालेला हात तू तुझ्या पदराने पुसशील आणि परत बोट धरून घराकडे नेशील किती मज्जा येईल ना आज्जी. मी हे सगळे स्वप्न बघत असताना तूच अचानक माझा जीव संपविण्याची भाषा करते आहेस? आजी असं का गं? मला जगायचय. या जगात तुझ्यासोबत खुप धम्माल करायचीय आणि तुच मला संपवायचे बोलतेस? का गं मी तुझ्या वंशाचा दिवा होऊन दाखवेन. खुप शिकेन मोठी होईल आणि सगळ्या जगाला अभिमानाने सांगेन आजी की माझ्या आजीने मला घडवले.
तू देखील मुलगीच ना गं आजी? तुझ्या आई बाबांनी असाच विचार केला असता तर तू जगात आली असतीस का? तू एक स्त्री असुनही माझ्या वेदना का समजून घेत नाहीस. मला माहित आहे आजी घरात तुझेच चालते बाबा, आजोबा काका सगळेच तुझे ऐकतात. आणि तुला हवाय कुलदीपक जो या घराचे नाव पुढे चालवील. आजी तुझ्या माघारी चालणा-या घराण्याच्या नावासाठी माझा जगण्याचा अधिकार का हिरावून घेतेस ग! देवी लक्ष्मी, सरस्वती, वैष्णोदेवी, माँ काली, दुर्गा या देवी स्त्रीरूपच आहेत ना. देवींचे कशाला अहिल्या सीता तारामती, मंदोदरी, द्रोपदी या पंचकन्या स्त्रीयाच होत्या ना. झाशीचीराणी लक्ष्मी, दाभाड्याची उमा, कित्तुरची राणी चेन्नमा, या ईतिहासातील स्त्रियांनी दोन्ही कुळाचा उध्दार केला ना आजी, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, सरोजनी नायडू या कोण होत्या ग आजी. स्त्रीयाच ना. कल्पना चावला, सुनिता विल्यम ची अवकाशातील भरारी, गाणकोकीळा लता मंगेशकर, आशा भोसले, यांचे सूर किती पिढ्या लक्षात ठेवतील सांग ना गं आजी. देशाची राष्ट्रपती, दिल्ली, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, प. बंगाल या प्रांताच्या मुख्यमंत्री महिलाच आहेत ना! किरण बेदी, निरूपमा राव, सुषमा स्वराज, राणी बंग अशी किती नावे सांगू ज्यांनी दोन्ही कुळाचा उध्दर केला. शिवरायांना घडवणारी जिजाऊ, कौसल्या या स्त्रीयांच होत्या ना! या सगळ्यांच सोड गं तू तरी कोण आहेस एक स्त्रीच ना मग तू स्त्री असून माझा जीव संपवू पाहतेस असं का गं आजी. तू ठरवलस तर मी या जगात येईन. पाहिन हे जग आनंदाने आणि असे काही करून दाखवेन की तु ही म्हणशील माझी नात गुणाची ती. माझं यश पाहून तुझ्या डोळ्यात आनंदाश्रु यावेत आणि मी त्यात नाहून निघावे. पण आजी तू एक स्त्री असूनही माझ्या जीवाला माझ्याच कोवळ्या रक्तात नाहू घालतेस का आजी असं का? कर विचार कर अजुनही विचार कर मला जगात येऊ दे ग... प्लीज....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा