हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ७ जुलै, २०११

दही घाल हातावरती...

दही घाल हातावरती रणा बाळ जाई
चुडा तुझा सावित्रीचा गडे सुनबाई
हे गाणे नेहमीच गायले जाते. पण रणी जाणा-या वीर पतीच्या हातावर दही घालणे एवढेच काम नाही तर प्रसंगी रणमैदनात उतरून लढण्याची तयारी पण या सावित्रींची होते. हाती असलेला चुडा मजबुत होतो. त्याचं कंकण बनते आणि हीच सावित्री आपला संसार घर नव्या जोमाने उभी करते.
ईतिहासात दाखले आहेत. पुराणात कथा आहेत. स्त्रियांनी आपल्या पतीला थेट रण मैदानावर मदत केली आहे. कैकयीने दशरथ राजाला युध्दभुमीवर मदत केली म्हणुनच रामाला वनवासाचा वर तिने मागीतला होता. सुभद्रा अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तुर संस्थानची राणी चेन्नमा, महाराष्ट्राच्या दाभाडे घराण्यातील उमा अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्या सावित्रींनी युध्दभुमीवर आपला पराक्रम दाखवला, पहिली महिला डॉक्टर आनंदी बाई जोशी या आपल्या पतीच्या ईच्छेखातर लोकापवादाची पर्वा न करता शिकल्या. सावित्री बाई फुलेंनी तर पुन्हा एकदा सावित्री या नावाला प्रचंड उंचीवर नेऊन ठेवले. आज प्रत्येक स्त्री स्वतःला सावित्रीची लेक म्हणवुन घेते. महात्मा ज्योतिबा फुले यांची समर्थ साथ त्यांनी दिली.
आपल्या आजुबाजुला अशा सावित्री कमी नाहीत. ज्यांनी आपल्या समर्थ हातांनी आपले घर उभे केले. पती अडचणीत असताना, त्याला मदतीची गरज असताना पदर खोऊन बांगड्या मागे सारून त्या उभ्या राहिल्या. आणि बगताबघता आपले घर त्यांनी उभे केले. अशाच सावित्रींचा हा आढावा आहे. त्यांच्या कर्तृत्वाला हा सलाम आहे. कारण घरातील लक्ष्मी कधी प्रसिध्दीच्या वलयात येतच नाही. तिचं प्रेरक काम जगासमोर आणवं हाच हेतु आहे. आज वटसावित्री पोर्णीमा सगळ्याच सौभाग्यवती देवासमोर हाच पती सात जन्म मिळू दे असे मागमे मागत असतात पण आमच्या सावित्रीचे पती आज देवाला हीच पत्नी सात जन्म मिळू दे आणि हा पहिला जन्म असु दे अशी मागणी मागत असतील
उमरगा येथील जिल्हापरिषद शाळेत मराठी माध्यमात शिक्षण घेणारी सामन्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी सर्वसामान्यमुलीसारखी लग्न होऊन सासरी येते तेंव्हा ती जेमतेम दहावी शिकलेली असते. तीच मुलगी पुढे १२ वी पदवी आणि एमबीए करून चाटे समुहाची जबाबदारी सांभाळते आहे. हे करताना सासु नवरा दीर २ मुले यांची जबाबदारी देखील पार पाडते. आणि पतीच्या पडत्या, अडचणीच्या काळात मदत करते ही गोष्ट साधी नाही.

1 टिप्पणी: