हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १४ जुलै, २०११

माझे गुरू, प्रदीपकाका

लातूर शहरातील एका ईमारतीचे पडणे आणि माझ्या पत्रकारीतेची सुरूवात या दोन भिन्न गोष्टी एकदाच झाल्या. ती ईमारत पडल्यानेच मला पत्रकार होण्याची संधी मिळाली. १९९३ ९४ चा काळ, त्यावेळी प्रकाश पाठक मन्वंतर नावाचे पाक्षिक चालवत होते आणि मी अकरावीच्या वर्गात होतो. पाठकांनी नगर पालीकेच्या विरोधात भुमिका घेतली होती. त नगर पालीकेतील कामावर आपल्या पाक्षिकातून चांगलीच टिका करत याचा राग त्यावेळेसचे नगराध्यक्ष मधुकर कोकाटे यांच्या मनात होताच. नियमावर बोट ठेवत कोकाटे यांना मन्वंतरचे कार्यालय पाडले. माझे आत्याचे मिस्टर दत्ता जोशी यांना छायाचित्र काढण्यावरून मापहाणदेखील झाली. त्यानंतर प्रकाश पाठकांनी विलासराव देशमुखांच्या विरोधात लढा उभारला. आणि या वेगळ्याच लिखाण शैली मुळे मी चांगलाच पर्भावित झालो. याच काळात मन्वतर ने डंकेल प्रस्तावावर विऱोध करणारा अंक काढला होता. यात आपला लेख देण्यासाठी मी मन्वंतरच्या तात्पुरत्या कार्यालयात गेलो. आणि तिथेच मला माझ्या पत्रकारीतेचे गुरू भेटले त्यांची भेटच माझ्या पत्रकारीतेची सुरूवात करणारी ठरली.
प्रदीप ननंदकर लातुरातील एक नेमस्त आणि विचारनिष्ठ पत्रकार. त्यांना मी काका म्हणतो. त्याच्या कामावर बोट दाखविण्याची हिंम्मत अजुन कोणात झाली नाही. पुढेही असे होणे नाही. ईतके स्वच्छ काम आहे. वैचारिक स्पष्टता आणि व्यवहारीक पारदर्शकता हे त्यांचे काही खास गुण  सोबतच्या माणसाला कामकरायला मोकळा वाव देणं आणि त्यांच्याकडून चांगले काम करूम घेणे ही काकांचा खासीयत. बातमीत आपला हेतू स्वछ्छ असावा हे काकानींच मला शिकवले आणि त्यांनी आयुष्यभर पाळले, कोठे चुकतोय असे वाटल्यावर ते बिनदिक्कत सांगायला चुकले नाहीत. एक तर चुक करू नये आणि घडलीच तर ती न लाजता स्वीकारावी हे काकांनीच मला शिकवले. माझ्या पत्रकारीतेचे गमभण त्यानीच गीरवून घेतले. आणि मी आज जो काही आहे ते खेवळ त्यांच्यामुळे हे मी अभिमानाने सांगतो.
माझ्यात काही दोष असतील तर ते माझे आहेत आणि काही चांगले असेल तर ते प्रदीप काकांचे आहे. १९९१४ ते २००२ हा नऊ वर्षाचा काळ मला त्यांच्यासोबत घालता आला. आणि मला याच काळात पत्रकारीता समजली. रेणापूरचा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, लातुर मध्ये काकांना वेळोवेळी मदत, सोलापूरला उपसंपादक अशी विविध स्वरूपातील कामे करता आली.
आजही मोबाईलवर फोन केला की बोल रे.. हा आवाज मनाला आश्वस्त करतो. आणि खरं सांगू ते माझ्यासाठी सेन्सॉर बोर्ड पण आहेत. मी या गुरू पोर्णीमेला एकच भिवचन देतो की माझ्या हातून जाणीवपूर्वक चुक होणार नाही. आणि पत्रकारीतेचा गैरवापर होणार नाही काका तुमचा हा शिष्य चुकला तरी ते प्रामाणिकपणे कबुल करेल त्यासाठी शिक्षा भोगावी लागली तरी हरकत नाही. काकांसारखा गुरू मिळायला भाग्य लागते.
या ओठांना छुंबू घएईन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलुन घ्यावी ईथल्या जगण्यासाठी

रविवार, १० जुलै, २०११

मला भेटलेली चांगली माणसे..

गुरूपोर्णीमेपासून सुरूवात करतोय.. माझ्या गुरू पासून
एखाद्या माणसाच्या आयुष्यात अशी काही वळणे येतात की आय़ुष्य वेगळीच दिशा घेतं. आणि ते योग्य मार्गाने देखील जाऊ लागतं. माझ्या जीवनात देखील अशी काही माणसे आली ज्यांच्या सहवासामुळे मला दिशा आणि मार्ग मिळत गेला त्याच माणसाविंषयी त्यांच्यातील सद्गुणांविषयी मी लिहीणार आहे. सुरूवात गुरू पोर्णीमेपासून करणार आहे. आणि अर्थात माझ्या या क्षेत्रातील गुरू पासून..
काही पत्रकार, साहित्तीक आणि साधी सरळ माणसे. माझ्या पत्रकारीतेच्या आयुष्याला आरंभ देणारे, शिकविणारे माझे दोन काका, संधी देणारे मालक, माझ्या कामाला वाव देणारे संपादक, नव्या आमि प्रगत दालनात संधी देणारे ज्येष्ठ पत्रकार, या प्रवासात साथ देणारे वरिष्ठ, समवयस्क मित्र, आणि खुप लोक जी वाचताना तुम्हालाही बरे वाटेल...

जाता पंढरीशी....

पंढरपूरच्या जवळ येताच मन त्या सावळ्याच्या दर्शनासाठी आसुसलेले असते. धाव्याच्या थांब्यानंतर तर पावले धावत पंढरीकडे जायला लागतात तुका म्हणे धावा पंढरीसी विसावा असा अभंगही या ओढीसाठी निर्माण झाला. एवढी अनिवार ओढ त्या मेघःशामाच्या दर्शनासाठी लागलेली असते. पंढरीचे राऊळ दिसायला लागते आणि हृदयाची धडधड वाढू लागते एक अनामिक हूरहूर लागून राहते. आणि धावतच पावले पुढ् सरकू लागतात. चंद्रभागेचे विस्तीर्ण वाळवंट लागत चंद्रकोरीच्या आकाराची भीमा माउली भासू लागते या वाळवंटातील वाळूचा प्रत्येक कण नी कण पवित्र वाटू लागतो. कारण विठोबा रखूमाईचा गजर करत ज्ञानोबा माऊलींची सोनपावले मुक्ताईच्या चिमुकल्या पावलासह ईथेच फेर धरत होती. तुकोबांच्या मुखातून पडलेल्या प्रत्येक शब्दाने ईथल्या वाळूचा प्रत्येक कण पवित्र झाला आहे. चोखामेळ्याच्या पदस्पर्शाने ही वाळू ईतकी पवित्र बनलीय की जळतील पापे जन्मांतरीची ही भावना आपसुक मनात येऊन जाते आणि हात सारखा जमिनीकडून मस्तकाकडे जायला लागतो.मनोभावे य़ा भुमीला वंदन करावे वाटते. आणि ती कृती वारंवार होत राहते.
एकमेकांच्या पायी लागून फेर धरून नाचणारा वैष्णवजणाचा मेळा एक अपूर्व पर्वणी भासू लागतो. हे मागे पाहिलेच नाही. ही वाळवंटीची घाई आता नव्याने पाहतोय असाच भास होतो. आणि डोळे भरून येतात प्रवासाचा शिण कोठे पळालाय कोणास ठाऊक. नुसत्या जवळ येण्याने ही अवस्था आहे तर प्रत्क्ष भेटीत काय होईल कोणास ठाऊक? पांडूरंगाचे आपले अंतर अधिक कमी व्हावे आणि त्या सावळ्याची राजस सुकुमार मूर्ती डोळ्यासमोर दिसावी एवढीच एक ईच्छा आता मनात उरलेली. पावले पुढे सरकत राहतात. मन मात्र वाळवंटातील ते दृष्य मनात साठवत राहतं. कापूरवस्तू असल्यागत त्याला मनाच्या डब्बीत घट्ट बंद करून ठेवावे वाटते. अत्तर जसं कुपीत साठवले जाते तसे हे सगळे मनाच्या कुपीत साठवले जाते हे दृष्य सुगंध अन्यत्र देण्यासाठी.
वाळवंटात रंगलेला किर्तनाचा फड, पखवाज आणि मृदंगाचा नाद कानांना तृप्त करतो. ठोबा रखूमाईचा गजर मनात गुंजारव करू लागतो. आणि पावलं मंदिराकडे जाऊ लागतात. नामदेवाची पायरी लागते आणि मन तृप्त होत जातं. एक विलक्षण आनंद आणि अनामिक ओढ मनात दाटलेली असते. अरे हीच ती जागा जिथे नामा किर्तनी रंगायचा येथेच जनीला पांडूरंगाच्या दर्शनाची उत्कट ओढ लागायची. य़ेथेच कान्होपात्रा जगाच्या बंधनामुळे पांडुरंगाच्या भेटीसाठी कंठी प्राण आणुन वाट पाहत असायची. चोखा येथेच देवा भेट रे मला, म्हणुन आळवणी करायचा आणि तो सावळा देखील धर्ममार्तंडांच्या डोळ्यात भक्तीचे अंजन घालण्यासाठी बाहेर येऊन दर्शन द्यायचा. काय विलक्षण दृष्य असेल ते! हेच तर मिळवायचय. बाकी काही नको मनात आता एकच भावना असते. नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नामदेव पायरीवर डोके आपाप झुकते. आणि पावलं पुढे सरकताता आता कशाची चिंता नसते.आता अन्य कशाची ओढ नसते, मनात ईतर कोणताङी विचार नसतो असते ती केवळ त्या सावळ्या घननिळाचे रूप पाहण्याची ओढ
झपाझप पावले राऊळात पडत जातात आपण त्या सावळ्याच्या घरात आलोत त्याच्या अगदी जवळ ही भावनाच पुलकीत करणारी असते. आता काही क्षणांची प्रतिक्षा वाटेतील देवांना, गरूड खांबाला आपोआप नमस्कार होत राहतो पण नजर असते ती केवळ विठूमाऊलीच्या रूपावर. कसा जगावेगळा देव आहे पहा. स्वत: पुरूष असुनही माऊली बनण्यात धन्यता माणतो. सासूरवाशीन सुन जशी अनेक दिवसांच्या खंडानंतर माहेरी आल्यावर आपल्या आईला भेटण्यासाठी उत्सुक असते तशीच ओढ प्रत्येक भक्ताच्या मनात असते. आपल्या आणि जगाच्या माऊलीला भेटण्याची. आणि तो प्रसंग येतो ज्यासाठी सगळा आटापिटा चाललेला असतो. गर्भगृहाच्या दारावर उभे राहताच त्या सावळ्याची घननिळ मुर्ती डोळ्यांना दिसू लागते आणि काय नवल डोळे आपोआप झरायला लागतात. जणु डोळ्यातील कचरा दूर व्हावा आणि त्या सावळ्याचे लोभस सुकूमार रूप स्वच्छ दिसावे. ललाटी गोपीचंदनाचा टिळा. डोळ्यात मायेचा अथांग सागर.कटी झळकणारा पितांबर. कटीवर हात आणि विटेवर उभा. अहाहा काय सुंदर रूप आहे. त्या सावळ्याचे
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
रवी शशीकळा लोपलिया
हे वर्णन अत्यंत खरे आणि यतार्थ वाटू लागते. बाकी काही नको. केवळ त्या रूपाकडे पाहत राहवे एवढीच एक ईच्छा मनात राहते आता यानंतर काहीच नाही हेच अंतीम साध्य होते अशी भावना मनात येऊन जाते.
आवडे हे रूप सोजीरे सगुण पाहता लोचन सुखावले
लाचावले मन लागिलेसी गोडी ते जिवे न सोडी ऐसे झाले
दृष्टीपुढे राही ऐसाची तू देवा जो मी तुज पाहे पांडुरंगा
तुका म्हणे आम्ही केली जे लडीवीळी पुरवावी आळी मायबापे.
तुकारामांना या सोजि-या सगुण रूपाचे वेड का लागले असावे ते कळते. नुसते कळते असे नाही तर ते वेड अनुभवता येते. मनाला एक विलक्षण तृप्ती लाभते, पण ही तृप्ती देखील अतृप्ततेला आपल्यात साठवून असते. कारण त्या सावळ्याचे रूप असेच डोळ्यासमोर असावे असे वाटत असते. काही क्षणच मिळतात त्या घननिळाच्या समोर थांबण्यासाठी. पण भुक खुप मोठी असते. मागे मागे सरकावेच लागते कारण आपल्या मागे असाच कोणी आसुसलेला उभा असतो विठूरायाच्या चरणाला स्पर्शण्यासाठी. आपल्या हाताला त्या सावळ्याच्या पायाचा स्पर्श विलक्षण अनुभुती देऊन जातो, आणि त्याच अनुभुतीची प्रचिती मागच्याला यावी यासाठी पावले मागे चालत जातात. पण नजर मात्र त्याच्यावरच खिळलेली असते. जमेल तेवढे रूप मनात साठवत मागे सरकत जातो आणि गर्भगृहाच्या बाहेर कधी आलो ते कळत देखील नाही. नजर समोर आणि पाय मागे जात असतात.  पायाच्या टाचा उंचावून ती सावळी मुर्ती पुन्हा पुन्हा पहावी वाटते. मागणे काहीच नाही, कसला नवस नाही, त्याचंही काहीच मागण नसतं. आम्ही त्याला पाहून तृप्त, नी आम्हाला समाधानी पाहून तो समाधानी. पावले मागे सरकत जातात, पण ती आत येतानाची अनिवार ओढ जाऊन पायात एक जडत्व आलेले. नको वाटत असताना बाहेर जावे लागतय. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतोय. मन भरत नाही तो आणि मनात तोच व्यापलेला. पुढे सरकत राहतो रखूमाईच्या भेटीसाठी मनात आणखी एक रूपाचा अभंग आळवत
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
बहूत सुकृताची गोडी म्हनुनी विठ्ठल आवडी........
सुशील कुलकर्णी
औरंगाबाद

गुरुवार, ७ जुलै, २०११

बरे झाले देवा

बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे या दुष्काळे पिडा केली
बरे झाले दिली बाईल कर्कषा होतसे दूर्दशा संसाराची
तुकोबांच्या या अभंगातून तर सगळे वाटोळे झाले हे खुप बरे झाले असाच अर्थ ध्वनित होतोय. यात कसले बरे झाले असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. या सगळ्या संकटामुळे आणि नुकसानी मुळे पांडुरंगाच्या ठाई सगळा मोह सारून तुकोबा एकरूप होऊ शकले. हेच तर तुकोबांना हवे होते. संसारात काही राम नाही तर खरा राम पांडुरंगाच्या चरणी आहे. हे तुकोबांना उमगले होते. आणि तेच तर त्यांनी जगाला सांगितले.
लोकांना देव आठवतो तो संकटाच्या वेळी. दानधर्म करावा तो मृत्युच्या वेळेला आजारी पडल्यावर चारदोन भिका-याला दहा पाच रूपये देउन स्वास्थ्य मिळावे असा व्यवहार आपण करू लागतो. देवा या संकटातून दूर कर मी अमुक देईन, तमुक करीन अशी सोदेबाजी सुरू होते. काळ वाईट आला की देवाची आठवण होते. आणि चांगला काळ असला की त्याची साधी आठवन देखील होत नाही. काम हाच देव. मी कामातून त्याची पूजा करतो. हे थोतांड मला मान्य नाही असे सांगणारे सगळे त्याच कामात अडचण आली की मग त्याच्या पायी लोटांगण घेऊ लागतात. स्वत:वरचा विश्वास एवढा तकलादू कसा? का फक्त अडचणीच्या काळात त्याची आठवन होते. मग महामृत्युंजय चा जाप, तीर्थाटने, ब्राह्मनांना दान धर्म, या आणि असल्या सवंग प्रकारांची जोरदार चलती असते. येथे देखील मी किती करतोय हा भाव असतो.
एकदा एक माणुस नदीच्या किना-यावरून चालत निघाला आणि चालता-चालता त्याचा जीवनपट त्याच्या डोळ्यासमोरून तरळू लागला सुख दु:खाचे दिवस त्याला दिसू लागले.आय़ु,यातील संघर्ष त्याच्या डोळ्यासमोरून जाऊ लागला तो चालतच राहिला. सगळा जीवनपट स्मरून झाल्यावर सहजच त्याचे लक्ष वाळूकडे गेले. तो जेंव्हा सुखाच्या दिवसात होता. तेंव्हा त्याच्या पावलासोबत आणखी दोन पावले त्याला दिसली. ती देवाची पावले असावित. दु:खाच्या दिवसात मात्र केवळ दोनच पावले दिसत होती. आणि परत सुखाच्या दिवसात चार पावले दिसत होती. या माणसाने ओळखले आणि सरळ देवाकडे पोहचला देवा समोर उभा राहून म्हणाला,
 देवा काय रे! तू पण सुखाचा सोबती का?”
देव म्हाणाला, का रे बाबा तुला असे का वाटले अचानक मी तर सदैव सोबत असतो सगळ्यांच्या.
 तो माणुस म्हणाला बघ जरा खाली, मी जेव्हा सुखात होतो तेंव्हा तू सोबत होतास बघ तुझी पावले दिसत आहेत. आणि मी जेव्हा अडचणीत होतो तेव्हा मात्र केवळ माझीच पावले दिसत आहेत. तू कोठे गेला होतास तेंव्हा? सुख परतल्यावर तू पुन्हा सोबत आलास. बरे झाले निदान तुला हे तरी कळाले की तू सोबत नसलास तरी माझ्या प्रयत्नाच्या जोरावर मला सुख परत मिळवता आले पण तू केवळ सुखात सोबत असतोस हे तरी सिध्द झाले.
देव फक्त मंद हसला आणि म्हणाला वेडा रे वेडा अजुनही वेडाच राहिलास तू निट बघ जरा वाळूवर तू सुखातून दु:खाच्या दिवसात गेल्यावर मीच तुला उचलून घेतले होते तुझ्या पायात तर चालण्याचे बळच नव्हते. सुखात आल्यावरच तुला खाली उतरवले निट बघ अडचणीच्या काळातील पावले तुझी नाहीत तर माझी आहेत. बघ तुच जरा निट. तू तर माझ्या हातावर अलगद होतास म्हणुनच तर अडचणीतून तरून जाऊ शकलास...
एवढे बोलून देव अंतर्धान पावला.  
त्या माणसाला आपली चुक उमगली खरी, पण अशी अनेक माणसे आहेत ज्यांना आपली चुक अजून कळालेली नाही दान धर्म करताना सुध्दा मी करतोय. मी देतोय हा भाव कायम असतो. जिथे आपले पोट भरण्यासाठी धडपड चालू असते जे मिळालेय ते कमी आहे असे वाटत असते माझे भागले माझ्या पोराचे भागले पाहिजे. ही भावना मनात असणारे ढोंगी दान धर्मकरून आपण देवाचे करतो हा अहं मनात ठेवत असतात. देवाची पूजा तरी का करायची. देवा मला सुखी ठेव हे मागण्यासाठी तो जे करणारच आहे ते त्याला मागायचे तरी का? त्याला आठवन राहवी म्हणुन स्थान, काळ, वेळ सगळे पुजेत सांगायचे काय काय मागतो आपण धन, धान्य, आय़ु,आरोग्य हे सगळे मिळावे टिकावे यासाठी सगळा अट्टहास चाललेला असतो. त्याच्या बदल्यात त्याला काय तर किडक्या सुपा-या, वाळलेल्या किडूक मिडूक खारका, पुन्हा पुन्हा पूजेत वापरून कुंकवाने लाल झालेले बदाम आणि पसा पसा धान्य जे शेवटी मध्यस्थाचे धन होते. जो असंख्य करांनी हे सगळे आपल्याला देत असतो त्याला किडकं द्यायचं आणि तो मागतही नसताना. भाजीवर तेलाची फोडणी मिळावी म्हणुन त्याची काही लेकर कष्ट करत असतात आणि महिण्याला अनेक लिटर तेल नंदा दीपासाठी त्याचीच लेकरं जाळत असतात. त्याच्या देव्हृयात प्रकाश केल्याचा अहंकार मनात जपत. या असल्या गोष्टी ऐवजी त्याच्या लेकराच्या घरात आपण दिवा पेटवू शकलो तर त्याला किती बरे वाटेल. तो आपल्या एखाद्या लेकराला सगळी सुखे का देतो? ?याचा कधी विचार केलाय. एकाला मोठे केले तर तो दुस-याला आधार देईल यासाठी पण दुस-याला आधार देणे तर सोडाच पण तो देवालाही विसरतो १० बाय १० ची फरशी मंदीरात बसवून ११० वर्ष दिसेल असे नाव त्यावर कोरून घेत असतो. कशासाठी तर मी दानशूर आहे हे कळण्यासाठी.        

येथ जातिकुळ अप्रमाण

भगवंत आणि भक्त यांच्यातील नाते विलक्षण आहे. नवविधा भक्ती प्रकाराच्या पलिकडचे हे सगळे आहे. माणसांनी निर्माण केलेली सगळी बंधने झुगारून हे नाते वाढत असते, बहरत असते.जाती पातीच्या चौकटी या भक्तीला मान्य नसतात. अलिकडच्या काळात जाती निर्मुलनासाठी अनेक प्रयत्न सरकारी आणि गैरसरकारी पातळीवर होताना दिसतात. अनेक महात्मे आणि समाजसुधारक यासाठी लढताना दिसतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमुर्ती रानडे अशी अनेक नावे आहेत ज्यांनी समाज जागृतीचे काम केले. छत्रपती शाहू महाराजांनी तर या प्रयत्नांना राजाश्रय दिला आणि या चळवळीला बळ मिळाले. पुढे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी झंझावात निर्माण केला आणि सामाजिक ऐक्याच्या प्रयत्नांना कायद्याचे बळ मिळाले. पण हजारे वर्षाची परंपरा असलेल्या या देशात शेकडो वर्षापासून हे प्रयत्न होताना दिसतात.
साडेतिनशे वर्षापूर्वी जगद्गूरू संत तुकारामांनी हाच संदेश दिला. त्यांच्या अभंगवाणीतून भक्तीच्या प्रांतात जातीपेक्षा भावना महत्वाची असते तुकोबांनी सांगीतले. सामाजिक समतेचा समरसतेचा विचार तुकारामांनी दिला.
तुका म्हणे नाही जातीसवे काम ज्याचे मुखी नाम तोचि धन्य
जात महत्वाची नाही हे पटवून देताना तुकोबांनी अनेक दाखले दिले आहेत. या दाखल्यातून कुळ जाती वर्ण यापेक्षा मनातली भावना महत्वाची हेच पटवून दिले. म्हणून तर विठोबा रखूमाईचा गजर करत चंद्रभागेच्या वाळवंटात देहभान विसरून किर्तनी रंगणा-या वारक-यांना एकमेकाच्या जातीची साधी आठवण देखील होत नाही.
काय रूपे असे परिस चांगला धातू केली मोला वाढ तेने
फिरंगी आटिता नये बारा रूके गुणे मोले विके सहस्त्रवरी
आणिक ही तैसी चंदनाची झाडे परिमळे वाढे मोल तया
या उदाहरणातूनच तुकोबांची सामाजिक समतेची शिकवन समोर येते. परिस त्याच्या रूपावरून नाही तर लोखंडाचे सोने करण्याच्या त्याच्या गुणामुळे मोलाचा ठरतो. रत्न जडीत तलवार त्यावर लावलेल्या रत्नामुळे नाही तर त्या तलवारीच्या धारेमुळे किमंती ठरते. तलवारीचे लोखंड वितळवले तर त्याची काहीच किंमत होणार नाही. पण जेंव्हा ती धारदार होते तेंव्हा ती हजारोची होते. चंदनाच्या झाडाचेही असेच आहे. त्याच्या रूपावरून त्याची किंमत ठरत नाही तर अंगभूत शितलता आणि सुगंध त्याचे मोल वाढवतात. भक्तीतही असेच आहे. कोण कोणत्या जातीत जन्माला आला यावरून त्याची भक्ती वा दर्जा कमी अधिक होत नाही. जात महत्वाची नाही तर भक्ती महत्वाची असते.
तुकारामांनी ये-या गबाळ्याचे काम नाही असे सांगत जात महत्वाची आहे असे देखील सांगितले आहे. पण ही जात वेगळी आहे. येथे तुकोबांची जात वेगळी आहे.
नका दंतकथा सांगो येथे कोणी कोरडे माणी बोल कोण
अनुभव येथे व्हावा शिष्टाचार न चलती चार आम्हा पुढे
निवडी वेगळे क्षिर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगाळली
या आशयाची जात तुकारामांना हवी होती. हरिजनाच्या (त्यावेळेचा अंत्यज) मुलाला कडेवर घेणारे एकनाथ, चोखाची उराउरी भेट घेणारा ज्ञाना हे सगळे तुकोबांच्या त्याच जातीतले नव्हेत का? हीच जात सांभाळली गेली पाहिजे एवढे मात्र नक्की
जन्मता विटाळ मरताची विटाळ मध्यंतरी सोवळे कैसे बप्पा?
हा प्रश्न देखील विटाळ चांडाळाचे चांडित्य मांडणा-या पढतमुर्खांसाठी झणझणीत अंजनच नाही का? देव खरेच जात माणणारा असता तर तो देव कसला? मग त्याच्याच भक्तांनी तरी ती का पाळयाची? माणसांनी ही बंधने घातली निर्माण केली आणि पालन केले नाव मात्र देवाचे लावले. प्रत्येक जिवात चराचरात देव असतो हे मान्य केले तर परमेश्वराचे अस्तीत्व असलेला एखादा जीव पवित्र आणि एखादा जिव अपवित्र असे कसे होईल. आणि एखादा जिव अथवा जात अपवित्र मानणे हा परमेश्वराच्या अंशाला अपवित्र माणणे होणार नाही का?
नको देवराया अंत आता पाहू’,  अशी आळवणी करणारी कान्होपात्रा गणिका होती म्हणुन तिची भक्ती पांडुरंगाने कमी माणली नाही. नामदेवाच्या किर्तनी प्रत्यक्ष शंकर रममाण झाला. ते ऐकण्यासाठी त्याने आपल्या मंदीराचे दार औंढ्यात वळवले. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे आळवून आपल्या श्रमात परमेश्वर पाहणा-या सावतास त्यांचा पांडुरंग अत्यंत आपुलकीने भेटतो. जन दूर दूर हो म्हणती तुज भेटू कवण्यारिती अशी तक्रार करणा-या चोखामेळ्यास त्यांचा देव मंदीरा बाहेर येऊन भेटतो. जिथे खरी भक्ती तिथे देव असतोच. कुब्जेचा मथुरेत जाऊन उध्दार करणारा कृष्ण, शबरीची मोठ्या श्रद्धेने आणलेली उष्टी बोरे खाणारा प्रभू राम ही सगळी देव जर जात धर्म पंथ आणि जन्माचे बंधन माणत नसतील तर ती निर्माण करण्याचा आणि पाळण्याचा अधिकार आपल्याला  कोणी दिला याचा साधा विचार देखील मनात येत नाही. की या सगळ्या कथाच खोट्या आहेत? असा आपला समज झालाय. तुकारामांच्या भक्तीचा प्रताप एवढा मोठा की तुकोबाची भाकरी भामगिरीच्या डोंगरावर घेऊन जाणारी तुकोबाची पत्नी आवडा बाई यांच्या पायतला काटा विठोबाने काढला. ज्याचे पाय धरायला सगळे जग आसुसलेले असते त्या सावळ्याने चक्क आपल्या भक्ताच्या पत्नीचे पाय धरले आणि तिची वेदना दूर केली मग देव जर आपल्या भक्ताची एवढी काळजी घेत असेल तर मग आपणच जाती पातीवर एखाद्याचे महत्व कमी एखाद्याचे महत्व जास्त असे समजण्याचा नादानपणा का करायचा.
परमेश्वर एवढे सगळे संकेत देत असेल आणि ते आपल्याला कळत नसतील आपण त्या चरित्रातील सोईचा अर्थ घेत आणि लावत असू तर आपण दुधखुळेच ठरू. भगवान श्रीकृष्णाने उच्च कुळातील दूर्योधनाच्या घरचे अन्न खाण्यापेक्षा उच्च विचाराच्या विदूराच्या घरचे अन्न खाणे पसंद केले ही कथा जन्मापेक्षा भाव महत्वाचा हा विचार आपल्या  मनात निर्माण करत नसेल पालथ्या घड्यावर पाणीच म्हणावे लागेल.....

दही घाल हातावरती...

दही घाल हातावरती रणा बाळ जाई
चुडा तुझा सावित्रीचा गडे सुनबाई
हे गाणे नेहमीच गायले जाते. पण रणी जाणा-या वीर पतीच्या हातावर दही घालणे एवढेच काम नाही तर प्रसंगी रणमैदनात उतरून लढण्याची तयारी पण या सावित्रींची होते. हाती असलेला चुडा मजबुत होतो. त्याचं कंकण बनते आणि हीच सावित्री आपला संसार घर नव्या जोमाने उभी करते.
ईतिहासात दाखले आहेत. पुराणात कथा आहेत. स्त्रियांनी आपल्या पतीला थेट रण मैदानावर मदत केली आहे. कैकयीने दशरथ राजाला युध्दभुमीवर मदत केली म्हणुनच रामाला वनवासाचा वर तिने मागीतला होता. सुभद्रा अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तुर संस्थानची राणी चेन्नमा, महाराष्ट्राच्या दाभाडे घराण्यातील उमा अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्या सावित्रींनी युध्दभुमीवर आपला पराक्रम दाखवला, पहिली महिला डॉक्टर आनंदी बाई जोशी या आपल्या पतीच्या ईच्छेखातर लोकापवादाची पर्वा न करता शिकल्या. सावित्री बाई फुलेंनी तर पुन्हा एकदा सावित्री या नावाला प्रचंड उंचीवर नेऊन ठेवले. आज प्रत्येक स्त्री स्वतःला सावित्रीची लेक म्हणवुन घेते. महात्मा ज्योतिबा फुले यांची समर्थ साथ त्यांनी दिली.
आपल्या आजुबाजुला अशा सावित्री कमी नाहीत. ज्यांनी आपल्या समर्थ हातांनी आपले घर उभे केले. पती अडचणीत असताना, त्याला मदतीची गरज असताना पदर खोऊन बांगड्या मागे सारून त्या उभ्या राहिल्या. आणि बगताबघता आपले घर त्यांनी उभे केले. अशाच सावित्रींचा हा आढावा आहे. त्यांच्या कर्तृत्वाला हा सलाम आहे. कारण घरातील लक्ष्मी कधी प्रसिध्दीच्या वलयात येतच नाही. तिचं प्रेरक काम जगासमोर आणवं हाच हेतु आहे. आज वटसावित्री पोर्णीमा सगळ्याच सौभाग्यवती देवासमोर हाच पती सात जन्म मिळू दे असे मागमे मागत असतात पण आमच्या सावित्रीचे पती आज देवाला हीच पत्नी सात जन्म मिळू दे आणि हा पहिला जन्म असु दे अशी मागणी मागत असतील
उमरगा येथील जिल्हापरिषद शाळेत मराठी माध्यमात शिक्षण घेणारी सामन्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी सर्वसामान्यमुलीसारखी लग्न होऊन सासरी येते तेंव्हा ती जेमतेम दहावी शिकलेली असते. तीच मुलगी पुढे १२ वी पदवी आणि एमबीए करून चाटे समुहाची जबाबदारी सांभाळते आहे. हे करताना सासु नवरा दीर २ मुले यांची जबाबदारी देखील पार पाडते. आणि पतीच्या पडत्या, अडचणीच्या काळात मदत करते ही गोष्ट साधी नाही.

आई, बाबा मी केला काय गुन्हा

ये आई ईकडे तिकडे कायबघतेस मी तुझ्या आतून बोलतेय. तुझंच रूप तुझ्याच उदरात वाढत असलेलं या नव्या जगात पाऊल टाकण्याची स्वप्न बघत असलेले. आई काय ऐकतेय मी हे. तू मला स्विकारायला तयार नाहीस. अगं तुझ्या अंशाला जो तुझ्या उदरात वाढतोय त्याला त्याला तू कापू फेकून देणार आहेस. रक्तामासाचा गोळा आहे गं मी. मी ही एक जीव आहे. माझ्या भावना अव्यक्त असल्या म्हणून काय झालं. पण मलाही यातना होतातच ना. केवळ तुम्हाला नको म्हणून मला काढून फेकताय. किता निष्ठूर झालीस गं तू आणि बाबा देखील.
बाबा मित्राला मुलगी झाली की तुम्हीच म्हणायचात ना, पहिली बेटी धनाची पेटी बाबा, मी तुमची धनाची पेटी तुमच्याच बायकोच्या उदरातून बोलतेय आता ही पेटी का फेकून देताय आता किटाळासारखी. आईच्या गर्भात वाढत असताना मंदीराच्या गर्भगृहात वाटावा तसा आनंद आणि विलक्षण समाधान मला वाटत होतं त्याच गर्भगृहाचा खाटीकखाना करताना तुम्हाला काहीच का वाटतं नाही.
खरं सांगू बाबा माणसं प्रगत का झाली तेच कळत नाही. शिकलेली माणसे एवढी जनावरं बनतील असं वाटलं नव्हतं जुन्या काळी देखील मुलांचा मोह होता. पण परमेश्वराने दिलेलं दान सहर्ष स्विकारल जायचं. ते आजच्या सारखे प्रगत नसूनही जंगली नव्हते.एखादा जीव जन्माला येण्यापूर्वीच कापून टाकत नव्हते. नव्या मशीनचा शोध लागला आणि माणसं जनावरे झाली नाही का हो बाबा.
आई- बाबा तुमचंच रूप मी तुमचंच प्रतीक वाढण्याची मोठं होण्याची आस मनात घालून ईश्वराने तुमच्या उदरात मला पाठवलं पाठवताना अनेक स्वप्न दिली आशा दिल्या आकांक्षा दिल्या. आई जेव्हा ते गाणं ऐकैयची ना दिल है छोटासा छोटीसी आशा, मुठ्टी भर मनकी भोलीसी आशा तेव्हा माझ्या मुठभर शरीरातही जगण्याची आशा आईच्या गर्भात उमलायची. तुमच्या जीवाचा आरसा मोठा होईल, खुप मोठा असं मी ठरवलं होतं पण तुम्ही काय करताय आई बाबा, तुमच्या रक्तामासाच्या गोळ्याला वैद्यकीय कचरा करताय. आईच्या उबदार कुशीतून भावनाशुन्य डॉक्टर मला बाजूला करतील आणि प्राण नसलेला रक्तामासाचा तुकडा एक मेडीकल वेस्टेज ठरेल. कचरा ठरेल. आई बाबा तुम्हाला याचं काहीच वाटतं नाही का. तुमचा एक अंश  असा वाया घालणार आहात का तुम्ही. आणि का? मी असा कोणता गुन्हा केलाय म्हणून मला असी शिक्षा देताय. ईश्वराने मला स्त्री जातीत जन्माला घालावं हा काय माझा दोष झाला का ते आपणच सांगा.
आई बाबा मला जगायचय मला या असं फेकून देऊ नका प्लीज. मला जगात येऊ द्या मोठं होऊ द्या मी तुमच्या वंशाचा दिवाच ठरेल एक दिवा लावम्यासाठी माझ्या जीवनात कायमचा अंधार का? मी असा काय गुन्हा केलाय.....

आजी तू देखील मुलगीच ना ग!....

सुभद्रेच्या गर्भात अभिमन्युने चक्कव्युह भेदण्याची कला शिकली होती म्हणे, आजी तू तर मला गर्भात मारण्याची भाषा करते आहेस. ती मला कळणारच ना! का आजी असा विचार करतेस? मी मुलगी आहे म्हणुनच ना! का मला भावना नाहीत मलाही हे सगळे सुंदर जग बघावे वाटतेच ना. माझ्याही स्वप्नांना तुझ्या कोतुकाचे पंख हवेत आजी. आणि तुच आता माझा जीव घ्यायला निघालीस मी जगात येण्याअगोदरच.. का मी तुझ्या वंशाचा दिवा होऊ शकत नाही म्हणुनच ना!
तुझा सुरूकतलेला हाता माझ्या गालावर कौतुकाने फिरावा असं मलाही वाटतं. संध्याकाळी दिवा लागल्यावर तुझ्या मांडीनर बसून परवंचा म्हणावा असं मलाही वाटतं. संध्यकाळी तुच तयार केलेल्या गरम गरम गोधडीत तुझ्या तोंडून परीच्या गोष्टी ऐकत गोड झोपावं असं मलाही वाटत आजी! तू कधी भयानक राझसाची गोष्ट सांगशील आणि घाबरलेली मी तुझ्या कुशीत लपेल. तु देखील आपल्या नऊवारी पातळाच्या मोठ्या पदराआड घेशील एक गोड पापा घेशील आणि त्याच आनंदात मी गाढ झोपी जाईल अशी कितीतरी गोड स्वप्न पाहिलीत मी आजी. तुझा हात पकडून लुटूलुटू चालत मी जयबाप्पाच्या मंदीरात जाईन तिथे प्रसाद मिळालेली साखर तू माझ्या ईवल्याशा हातावर घालशील आणि मी ती साखर खाताना सगळा ङात चिकट करेल, माझा चिकट झालेला हात तू तुझ्या पदराने पुसशील आणि परत बोट धरून घराकडे नेशील किती मज्जा येईल ना आज्जी. मी हे सगळे स्वप्न बघत असताना तूच अचानक माझा जीव संपविण्याची भाषा करते आहेस? आजी असं का गं? मला जगायचय. या जगात तुझ्यासोबत खुप धम्माल करायचीय आणि तुच मला संपवायचे बोलतेस? का गं मी तुझ्या वंशाचा दिवा होऊन दाखवेन. खुप शिकेन मोठी होईल आणि सगळ्या जगाला अभिमानाने सांगेन आजी की माझ्या आजीने मला घडवले.
तू देखील मुलगीच ना गं आजी? तुझ्या आई बाबांनी असाच विचार केला असता तर तू जगात आली असतीस का? तू एक स्त्री असुनही माझ्या वेदना का समजून घेत नाहीस. मला माहित आहे आजी घरात तुझेच चालते बाबा, आजोबा काका सगळेच तुझे ऐकतात. आणि तुला हवाय कुलदीपक जो या घराचे नाव पुढे चालवील. आजी तुझ्या माघारी चालणा-या घराण्याच्या नावासाठी माझा जगण्याचा अधिकार का हिरावून घेतेस ग!  देवी लक्ष्मी, सरस्वती, वैष्णोदेवी, माँ काली, दुर्गा या देवी स्त्रीरूपच आहेत ना. देवींचे कशाला अहिल्या सीता तारामती, मंदोदरी, द्रोपदी या पंचकन्या स्त्रीयाच होत्या ना. झाशीचीराणी लक्ष्मी, दाभाड्याची उमा, कित्तुरची राणी चेन्नमा, या ईतिहासातील स्त्रियांनी दोन्ही कुळाचा उध्दार केला ना आजी, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, सरोजनी नायडू या कोण होत्या ग आजी. स्त्रीयाच ना. कल्पना चावला, सुनिता विल्यम ची अवकाशातील भरारी, गाणकोकीळा लता मंगेशकर, आशा भोसले, यांचे सूर किती पिढ्या लक्षात ठेवतील सांग ना गं आजी. देशाची राष्ट्रपती, दिल्ली, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, प. बंगाल या प्रांताच्या मुख्यमंत्री महिलाच आहेत ना!  किरण बेदी, निरूपमा राव, सुषमा स्वराज, राणी बंग अशी किती नावे सांगू ज्यांनी दोन्ही कुळाचा उध्दर केला. शिवरायांना घडवणारी जिजाऊ, कौसल्या या स्त्रीयांच होत्या ना! या सगळ्यांच सोड गं तू तरी कोण आहेस एक स्त्रीच ना मग तू स्त्री असून माझा जीव संपवू पाहतेस असं का गं आजी. तू ठरवलस तर मी या जगात येईन. पाहिन हे जग आनंदाने आणि असे काही करून दाखवेन की तु ही म्हणशील माझी नात गुणाची ती. माझं यश पाहून तुझ्या डोळ्यात आनंदाश्रु यावेत आणि मी त्यात नाहून निघावे. पण आजी तू एक स्त्री असूनही माझ्या जीवाला माझ्याच कोवळ्या रक्तात नाहू घालतेस का आजी असं का? कर विचार कर अजुनही विचार कर मला जगात येऊ दे ग... प्लीज....